सेंट्रल बँक ऑफ इंडिया अप्रेंटिस भर्ती 2023

 सेंट्रल बँक ऑफ इंडियाने अप्रेंटिस (शिकाऊ) पदासाठी बंपर भरतीची जाहिरात काढली आहे. तब्बल 5000 जागांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. जे उमेदवार या पदासाठी अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छूक आहेत, त्यांनी अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात अर्ज करावेत.

CBI Bharti 2023


https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity-view/6412cbf5977ed17c321d25e2
Central Bank Requirement



Central Bank of India: सेंट्रल बँक ऑफ इंडियाने अप्रेंटिस (शिकाऊ) पदासाठी बंपर भरतीची जाहिरात काढली आहे. तब्बल 5000 जागांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. जे उमेदवार या पदासाठी अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छुक आहेत, त्यांनी अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात अर्ज करावेत. 20 मार्चपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 03 एप्रिल 2023 आहे. 

कोण अर्ज करू शकतो? 


पदवीधर तरुणांना सरकारी नोकरी मिळण्याची ही उत्तम संधी आहे. या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केलेली असावी. तसंच 20 ते 28 वयोगटातील उमेदवार या पदासाठी पात्र असणार आहेत. 


फी किती भरावी लागेल? 

अपंग उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 400 रुपये शुल्क भरावं लागणार आहेत. याशिवाय SC, ST आणि महिला उमेदवारांना अर्जासाठी 600 रुपये भरावे लागणार आहेत. इतर सर्व उमेदवारांना अर्जासाठी 800 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. 

किती वेतन मिळेल? 

देशभरातील विविध राज्यात ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. उमेदवार ज्या शाखेत निवडला जाईल त्यानुसार त्याला वेतन मिळणार आहे. उदाहरणार्थ, ग्रामीण आणि निमशहरी शाखेसाठी 10,000 रुपये वेतन असणार आहे. तर शहरी शाखेसाठी 15,000 रुपये वेतन निश्चित करण्यात आलं आहे. मेट्रो शहरातील शाखेसाठी दरमहा 20,000 रुपये वेतन असणार आहे. 


असा करा अर्ज 


सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अप्रेंटिस पदासाठी फक्त ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity-view/6412cbf5977ed17c321d25e2

 या  वेबसाइटला भेट द्यावी लागेल. यानंतर या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाईल. लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ प्रकारची असेल. याबद्दलचे आणखी अपडेट्स मिळविण्यासाठी वेळोवेळी अधिकृत वेबसाइट तपासत रहा.